Ad will apear here
Next
‘युवकांनी तावडे समाजाचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावे’
तावडे अतिथी भवनाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिक्षणमंत्री विनोद तावडे, वर्षा तावडे, आमदार भास्कर जाधव, दिनकर तावडे आदी मान्यवर.

मुंबई : ‘क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ या मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर केले. तावडे मंडळाच्या कार्यकर्त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे तावडे अतिथी भवनसारखी दिव्य भव्य वास्तू आज दिमाखात उभी राहिली. भविष्यात तावडे मंडळाच्या युवा पिढीने पुढाकार घेऊन तावडे मंडळाच्या युवकांची शाखा अथवा मंडळ निर्माण करावे. युवकांच्या या मंडळाने मुंबई आणि राज्यापुरते मर्यादीत न राहता आपल्या समाजाचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे,’ असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

क्षत्रिय मराठा हितवर्धक मंडळाला ७५ वर्ष असून, क्षत्रिय मराठा हितवर्धक विवाह मंडळाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील आडिवरे गावी नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचा लोकार्पण सोहळा १० मे रोजी शिक्षणमंत्री तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदारपणे पार पडला. या प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार बाळ माने, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळचे अध्यक्ष दिनकर तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार शंकरराव तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे, उपाध्यक्ष राजेंद्र तावडे, अतिथी भवनाचे शिल्पकार आर्किटेक्ट संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘त्रिवेणी संगम आणि तावडे समाजाचा आठशे वर्षांचा इतिहास असलेल्या वास्तूत सुमारे पंधरा हजार चौरस फूट बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोन मजली इमारत असून, येथे राहण्यासाठी सुसज्ज आठ रूम, समोर सुंदर उद्यान सांस्कृतिक व सामाजिक केंद्र आदी सुविधा आहेत. येथे निसर्गाने मुक्त उधळण केलेली असून, पुरातन महाकाली मंदिर आणि निवासाची उत्तम सोय या वास्तुमुळे उपलब्ध झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाना व भाविकांना एक पर्वणी ठरणार आहे; तसेच यापुढे ही वास्तू सर्वांसाठी मार्केट दराने, तर तावडे बंधूंसाठी माफक दारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे,’ असे तावडे हितवर्धक मंडळांचे अध्यक्ष दिनकर तावडे म्हणाले.

‘तावडे हितवर्धक मंडळामार्फत युवकांनी आता पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून पुढे यावे आणि उद्देशाने  नवीन उद्योजकांना पुढे आणण्यासाठी तावडे मंडळ प्रयत्नशील असेल व आपला प्रसार आणि आपले कार्य युवकांनी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उमटवावे,’ अशा शुभेच्छा विनोद तावडे यांनी या प्रसंगी दिल्या. ‘ही वास्तू म्हणजे एक आजच्या युवकांसाठी आदर्श आहे. तावडे कुटुंबियांनीही आपल्या घरातील प्रत्येक शुभकार्य या तावडे अतिथी भवनात साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा; तसेच या वास्तूचा दिमाखदारपणा जास्तीत लोकापर्यंत पोहचिविण्याच्या दृष्टीने या वास्तूचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी कसे पोहचतील याचा विचार करावा’ असेही तावडे यांनी सांगितले.



सतीश तावडे यांनी प्रास्ताविक केले. खासदार राऊत, आमदार जाधव यांचीही या प्रसंगी भाषणे झाली. आर्किटेक्ट संतोष तावडे व अध्यक्ष दिनकर तावडे यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. या प्रसंगी क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

(Please click here to read this news in English.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZTJBO
Similar Posts
तावडे अतिथी भवनाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : आडीवरे (ता. राजापूर) येथे नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे उद्घाटन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते १० मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
‘गुरुजींचा ऑर्गन वाजला, की गायक गातो असे वाटायचे’ रत्नागिरी : ‘पं. तुळशीदास बोरकर म्हणजे हार्मोनियम आणि ऑर्गन या वाद्यांचे भीष्माचार्य होते. गुरुजींचा ऑर्गन वाजला, की साक्षात गायक गातो असे वाटायचे. गुरुजी केवळ वादकच नव्हते, तर वाद्यातील तंत्रज्ञानाचीही त्यांना उत्तम माहिती होती. ते स्वतः उत्तम ट्युनिंग करायचे. त्यांच्या निधनामुळे ज्यांच्यापुढे नतमस्तक
शाह यांची टाटा व माधुरी दीक्षित यांच्याशी भेट मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सहा जून रोजी मुंबईत प्रख्यात उद्योगपती रतन टाटा व चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सदिच्छा भेट घेतली.
‘कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या’ मुंबई : ‘सन २०१०ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया होऊन ७० टक्के स्थानिकांना सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय करून कोकणातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा,’ अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे २६ जून रोजी विधानसभेत केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language